मुंबई : वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाकडून बिबट्याच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. वसई किल्ला येथे पहिल्यांदाच बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने बिबट्याला धडक दिली. दरम्यान, दुचाकीवरील सबंधित व्यक्तीने वनविभागाला घटनेची माहिती देताच घटनास्थळी पुढील तपास करण्यासाठी वाइल्डलाफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) या स्वयंसेवी संस्थेने लाईव्ह कॅमेऱ्यांसह परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. दरम्यान, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडियाचे संशोधक निकित सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील एक चमू देखील बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाला मदत करत आहे.

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

बिबट्याच्या पायांचे ठसे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळले आहेत. परिसरात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे वनविभागाकडून बिबट्या दिसल्यावर काय करावे, काय करू नये याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.