वाडा तालुक्यातील गुंज गावातील वनक्षेत्रात राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेला अंगणात खेळत असताना बिबटय़ाने पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गुंज गावातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळ गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर जंगल परिसरात शिवा भोईर यांचे एकटय़ाचे घर आहे. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांची चार वर्षीय मुलगी छकुली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्या वेळी शिवा भोईर यांच्या डोळ्यादेखत बिबटय़ाने तिला पळवून नेले. या घटनेमुळे शिवा भोईर भेदरले आहेत. या घटनेनंतर पोलीस आणि तहसील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard takes girl child