मुंबई : गेल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईत लेप्टोचा धोका वाढला आहे. गेल्या आठवड्याभरात नऊ नवीन रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर हिवतापाचे एकदम २०० नवीन रुग्ण या आठवड्याभरात आढळले आहेत.
मुंबईतील पावसाळी आजारांचा विशेषतः स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला असून स्वाईन फ्लूचा एकही नवीन रुग्ण या आठवड्यात आढळलेला नाही. मात्र दुषित पाण्यातून चालल्यामुळे होणारा लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबईत नवीन नऊ रुग्ण आढळले आहेत. हिवताप आणि डेंग्यूचेही रुग्ण वाढले असले तरी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबईतील पावसाळी आजारांचा, स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे या आठवड्याभरात लेप्टोस्पायरोसिसचे ९ नवीन रुग्ण आढळले आहेत, गेल्या आठवड्यात १२ रुग्ण आढळले होते. त्यामुळे या महिन्यात आढळलेल्या लेप्टोच्या रुग्णांची एकूण संख्या २७ वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत हिवतापाचे २०७ रुग्ण होते. त्यांची संख्या आठवड्याभरात ३९८ वर पोहोचली आहे. त्यामुळे या महिन्यात सुमारे २०० रुग्ण आढळले आहेत. या आठवड्यात डेंग्यूचे सुमारे ५० रुग्ण, तर गॅस्ट्रोचे ८० रुग्ण आढळले आहेत.
आजार …….सप्टेंबर महिन्यातील रुग्ण…..जानेवारीपासून आतापर्यंतचे एकूण रुग्ण
हिवताप(मलेरीया) …..….३९८ …………………२९९०
लेप्टो ……………………..२७……………………….१९०
डेंग्यू …………… … …….१३९ ……………………४९२
गॅस्टो …………… ………..२०८……………………४२६०
कावीळ (हेपेटायटीस) …….४५…………….४१४
चिकुनगुन्या ………………..२……………..१२
स्वाईन फ्लू …………………..६…. ……….३०४