मुंबई शहर बंद करायला लावलेल्या पहिल्या पावसाचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून, शहरावर लेप्टोच्या साथीचे सावट पसरले आहे. अवघ्या सात दिवसांत बारा जणांचा बळी गेला आहे. या साथीचे रुग्ण प्रामुख्याने गोरेगाव ते दहिसर भागात आढळले आहेत. लेप्टोच्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर आजाराची लक्षणे दिसण्यासाठी ३ ते २१ दिवसांचा कालावधी लागत असल्याने आणखी काही दिवस लेप्टोचे रुग्ण आढळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवडय़ाभरात लेप्टोस्पायरोसिसचे २१ रुग्ण आढळले असून, एक वगळता बाकी सर्व मृत्यू गोरेगाव ते दहिसर पट्टय़ात झाले आहेत. त्यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कंबर कसलेल्या पालिका अधिकाऱ्यांना आता लेप्टो व ही साथ पसरवणाऱ्या उंदरांकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. पुराच्या पाण्यात जमिनीखालील उंदीर मरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यावर लेप्टोचे रुग्ण वाढल्याचे दिसते, असे निरीक्षण आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. मात्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या वेळी अवघ्या आठवडाभरात लेप्टोच्या मृत्यूंची संख्या तिप्पट आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या बारापैकी चौघे दहिसर, तीन कांदिवली, चार मालाड व एक मृत्यू वरळी येथील आहे. यात १३ वर्षांखालील एका मुलाचा, १३ ते ३० वयोगटांतील सात जणांचा, ३१ ते ४५ मधील तिघांचा तर त्या पुढील वयोगटातील एकाचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संजय देशमुख यांनी दिली.
लेप्टो झालेल्या बारापैकी सात जणांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाला. दोघांचा मृत्यू एक दिवसानंतर तर ३ मृत्यू तीन दिवसानंतर झाले. यातील बहुतांश रुग्ण ताप आल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे गेले होते. आजाराची पुढची पातळी गाठल्यानंतर रुग्णालयात आल्याने
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा