रविवारी दहा जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची नोंद आहे. यातील सात रुग्ण दक्षिण भागातील आहेत. जुलैमधील लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्या ७५ वर पोहोचली असून येत्या काही दिवसांत या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
जूनमधील पहिल्याच पावसात शहरात लेप्टोची साथ आली होती. त्या वेळी ६५ जणांना लेप्टोची लागण झाली होती. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ८० टक्के रुग्ण व मृत्यू दहिसर ते मालाड या परिसरातील होते. शुक्रवार-शनिवारपासून लेप्टोचे रुग्ण आढळू लागले. रविवापर्यंत दहा रुग्णांची नोंद झाली असून त्यातील चार माटुंगा, किंग्ज सर्कल परिसरातील आहेत. भायखळा येथे दोन तर धारावी, अंधेरी पूर्व, गोरेगाव, गोवंडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
स्वाइन फ्लूही जोरात
स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून आतापर्यंत रुग्णांची संख्या दीडशेहून अधिक झाली आहे. जुलैमध्ये स्वाइन फ्लूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा