अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुणे गुन्हे अन्वेषण विभागाला आणि राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाला फारसे यश आलेले नाही. पुणे पोलिसांनी दोघा जणांना गोव्यातून ताब्यात घेतले असले, तरी त्यांच्याकडून अद्याप  महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली नाही, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला, त्या पिस्तुलातील काडतुसांबाबत मिळालेल्या न्यायवैद्यकतज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारेच तपासाची चक्रे फिरत आहेत. आतापर्यंत ज्यांना अटक वा ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडून मारेकऱ्यांनी वापरलेल्या पिस्तुलाशी साधम्र्य असल्याच्या दुव्यावरूनच तपास केला जात आहे. मात्र त्यात फारशी माहिती मिळत नसल्याचे  सूत्रांनी स्पष्ट केले.

Story img Loader