‘महाराष्ट्रात एवढे इथेनॉल तयार होऊ शकते की एक लिटरही पेट्रोलची गरज लागणार नाही. सोने, कोळसा, खनिज तेल आदींच्या आयातीवर अब्जावधींचे परकीय चलन खर्च होते. योग्य नियोजन केल्यास ते सर्व देशातही उत्पादन होऊ शकते,’ अशी भाकिते भाजपच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२५’ चे प्रमुख आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूरमध्ये स्वच्छतागृहांचे घाण पाणी विकून १८ कोटी रुपये महापालिकेला उत्पन्न मिळत आहे. बिहार व उत्तरप्रदेशमध्ये पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर केला, तर तेथील नागरिकांना मुंबईत यावे लागणार नाही. पण राजकीय नेते व पक्षांना केवळ आपली खुर्ची आणि पुढील निवडणुकीची चिंता असते. देशाचा विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ते काम करीत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामांची यादी सादर करताना ‘सह्य़ाद्री अतिथीगृह ताजमहालपेक्षा सुंदर बांधले आहे,’ अशी उपमा द्यायलाही ‘व्हिजनरी गडकरी’ विसरले नाहीत.
गडकरींच्या दूरदृष्टीतून आणि चिंतनातून नवनवीन कल्पनांचा आविष्कार मांडणाऱ्या तुलिप सिन्हा लिखित ‘इंडिया इन्स्पायर’ पुस्तकाचे प्रकाशन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात शुक्रवारी झाले. ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर,  दिग्दर्शक मधुर भांडारकर, भाजप नेते खासदार वरूण गांधी, इंडियन र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष नानिक रूपानी आदी उपस्थित होते. सरकारी कारभार, राजकीय नेते व पक्षांची कार्यपध्दती यावर गडकरींनी टीकाटिप्पणी केली. सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांची छाया पडली की कोणताही प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. पण आपल्या कारकीर्दीत झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वरळी वांद्रे-सागरी सेतू आदींची जंत्री त्यांनी पुन्हा उलगडली. सेंद्रिय खताचा वापर, अपारंपारिक स्त्रोतांपासून वीजनिर्मिती, जैविक इंधन, आदींच्या वापरासाठी त्यांनी नागपूर विभागात काय कामगिरी केली आहे आणि काय करता येऊ शकते, याचीही त्यांनी माहिती दिली. देशात नवनवीन कल्पनांची कमतरता नाही. पण राजकीय इच्छाशक्ती व दूरदृष्टी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले