पैशांवरून झालेल्या वादातून पत्नी आणि मुलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नौदलातील एका निवृत्त अधिकाऱ्यास बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राजेशकुमार यदुराजसिंग बदोरिया (४५) असे शिक्षा झालेल्या नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून तो ब्रह्मांड येथील अनामिका इमारतीमध्ये राहत होता. कुवतीपेक्षा जास्त गृहकर्ज घेतल्याने त्याला कर्जाचे हफ्ते फेडणे शक्य होत नव्हते. त्यातूनच त्याची पत्नी संगीता हिच्यासोबत त्याचे भांडण होत होते. ३० मार्च २०१० रोजी याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्या वेळी संतापलेल्या राजेशकुमार याने मसाला कुटण्याच्या खलबत्त्याच्या बत्त्याने पत्नी संगीता आणि मुलगी तनिष्का (५) यांची हत्या केली.
सध्या मुंबई पोलीस दलात साहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले आणि कासारवडवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खाडे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी बुधवारी ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.डी. सावंत यांच्या न्यायालयात झाली. तसेच सरकारी वकील संजय लोंढे यांनी या खटल्याचे काम पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा