पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तैनात केलेल्या कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांच्या वेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली .
पावसाळ्यात अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात उतरतात आणि अंदाज न आल्यामुळे प्राण गमावतात. त्यामुळे पालिकेने यंदाही गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात केले आहेत. दोन पाळ्यांत काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीवरील जीवरक्षकाला आठ हजार तर हंगामी जीवरक्षकाला सहा हजार रुपये देण्यात येत होते. यावर्षीपासून कंत्राटी जीवरक्षकाला १० हजार रुपये, तर हंगामी जीवरक्षकाला आठ हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader