अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गैरजा भागवताना मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना श्वास घ्यायला मोकळ्या जागा आणि सांस्कृतिक गैरजा पूर्ण करण्याचे पर्यायच सापडत नाहीत. शहरात अशी ठिकाणे एका ठरावीक भागातच केंद्रित झालेली दिसतात. म्हणून सुट्टीच्या दिवशी ताण निवळण्यासाठी शहराच्या दुसऱ्या टोकाला किंवा शहराबाहेर जाणे मुंबईकर टाळतात. कारण तिथे जाणे-येणे हेच ताण वाढवणारे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खेडय़ाकडे चला, असे महात्मा गांधींनी सांगितले असले तरी स्वातंत्र्यानंतरचा प्रवास हा खेडय़ांपासून शहरांपर्यंत झाला आहे. आता तर विकासाचे मॉडेल म्हणून शहरांची निर्मिती आपण स्वीकारली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदांचा प्रवास नगैरपालिका आणि त्यानंतर महापालिकांपर्यंत होत आहे. रोज हजारो लोक पोटापाण्यासाठी मुंबई महानगराच्या वेशीवर येऊन धडकतात आणि हे महानगैर प्रत्येकाला रोजगार मिळवूनही देते. मुंबईकर- ठाणेकर त्यांच्या शहराबद्दलची कृतज्ञता इतरांना मदत करून व्यक्तही करतात. मात्र तरीही एक प्रश्न उरतोच.. या महानगरांमध्ये राहणे आनंददायी आहे का?

सकस आहाराची उपलब्धता ते दररोज नवे काही शिकण्याची, अनुभवण्याची एखाद्याची गैरज शहर कसे पूर्ण करते यावरून ते किती परिपूर्ण आहे ते ठरते. इतकेच काय तर रोजगारक्षमता, कामाच्या ठिकाणी करावा लागणारा प्रवास, आठवडय़ाचा विरंगुळा, वैद्यकीय-शिक्षणविषयक सुविधा अशा अनेक घटकांमधून शहराविषयी समाधान व्यक्त होत होते. नागरिकांचे जीवन आनंददायी करण्यात या सुविधाचा मोठा हात असतो, तसा आनंद मुंबई, ठाण्यासह तमाम मोठय़ा शहरांमध्ये मिळतो का आणि तो मिळत नसेल तर केवळ पोटापाण्याचा उद्योग मिळवून देण्यासाठीच शहराकडे चलायचे का? याची उत्तरे शोधावी लागतील.

अमेरिकेमध्ये प्रमुख शहरांचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ (आनंद निर्देशांक) काढला गेला तेव्हा डोंगरांच्या कुशीत वसलेल्या ‘बोल्डर’ला प्रथम क्रमांक मिळाला. काय कारणे होती त्यामागे? एकतर इथली बहुतांश माणसे सहज चालत त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतात इतपतच कामाचे ठिकाण दूर आहे. अमेरिकेतील इतर शहरांच्या तुलनेत स्थूलतेचे आणि धूम्रपानाचे प्रमाण या शहरात कमी आहे आणि व्यायामाचे प्रमाण अधिक आहे. मोकळा श्वास घ्यायला इथे भरपूर मोकळी जागा आहे. डोंगराळ भाग असल्याने रोजगाराची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे येथील माणसांनाही ताण जाणवतोच. मात्र इतरांच्या तुलनेत तो सुसह्य़ आहे. दिवसाचा बराच वेळ ते कुटुंबीयांसमवेत घालवू शकतात. आयुष्यात ध्येयाकडे हळूहळू जात असल्याचे त्यांना वाटते, परंतु ते आनंदी आहेत. म्हणूनच येथील माणसांच्या चेहऱ्यावर हसू असते.

जगातील राष्ट्रांचाही असा आनंद निर्देशांक काढला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्वत विकास योजना नेटवर्क’कडून या निर्देशांकाच्या कामांवर देखरेख ठेवली जाते. व्यवसाय, आर्थिक स्थैर्य, शहरातील नागरिकांचा सहभाग, संवाद आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक वैविध्य, शिक्षण, भावना, पर्यावरण, आहार, निवास, सरकार आणि राजकारण, कायदा, आरोग्य, धर्म आणि शिकवण, वाहतूक अशा विविध निकषांचा आधार घेत निर्देशांक काढला जातो. सामाजिक एकोपा, आहार-विहाराचे स्वातंत्र्य, आयुष्यमान आणि भ्रष्टाचार याचीही पाहणी होते. यावर्षी त्याचे निकाल आले तेव्हा भारताचा क्रमांक १५६ देशांच्या यादीमध्ये १३३ वर होता. इतरांच्या तुलनेत भारतीय किती दु:खी आहेत त्याचा हा पुरावा. २०१७ मध्ये भारत १२२ व्या क्रमांकावर होता, तर २०१६ मध्ये ११८ व्या क्रमांकावर. डेन्मार्क, स्वित्र्झलड, नॉर्वे आणि आता फिनलंड या पाहणीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.

या निकषांवर आपल्या महानगरांमधील आनंद निर्देशांक काढायचा म्हटला तर तो किती तळाला जाईल, हे लक्षात येते. घडय़ाळाच्या काटय़ावर चालणारी ती मुंबई.. म्हणूनच कदाचित या शहरातील प्रत्येक जण धाप लागेपर्यंत धावत असतो. हे धावणे सुसह्य़ करण्याचा एक पैलू म्हणजे वाहतूक व्यवस्था. मुंबईकर रोज सकाळ-संध्याकाळ किमान दोन ते कमाल चार तास प्रवास करतो. रोजचा प्रवास किती प्रकारचे ताण देतो त्याचे हे एक उदाहरण. सकाळी विरार किंवा डोंबिवलीहून सुटणारी ७.३५ किंवा ८.४३ किंवा ९.३२ ची लोकल पकडणे हा लाखो मुंबईकरांचा रोजचा शिरस्ता. आता त्यासाठी रोज सकाळी लवकर उठण्याचा ताण. सर्व वेळेत आटोपून घरातून बाहेर पडण्याचा ताण. घराखालून रेल्वेस्थानकापर्यंत रिक्षा, बस मिळवण्याचा ताण. बस मिळाली तर बसायला जागा मिळायला हवी किंवा मग उभ्याने प्रवास. हातातले सामान सांभाळत खिशातून-बॅगेतून सुट्टे पैसे काढून द्यायचे म्हटले तरी तो तापच. बस वाहतुकीत अडकली नाही तर मिळवली. नाहीतर लोकल सुटायची. इंडिकेटर असलाच (त्या अस्तित्वाची आणि चालत असल्याचीही खात्री नाही) तर गाडीची वेळ पाहता येईल. त्याचवेळी पुलावरील गर्दीतून माग काढत बॅग सांभाळत एकमेकांवर न आदळता, न पडता उतरण्याचा ताण. स्थानकावरील गर्दी तर अंगावरच यावी अशी. गाडीत दारावर लटकलेले प्रवासी पाहून गाडीत बसण्याआधीच गैरगरायला होते. गर्दीत गाडीत घुसण्याचे दिव्य पार पडल्यानंतर बसणे तर सोडाच, किमान नीट उभे राहण्याची आणि अपेक्षित स्थानकावर उतरण्याची कसरत तर जीवघेणी. पुन्हा एकदा पूल चढून-उतरून, रिक्षा-बस-पायी कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा ताण. या दरम्यान भांडणे, खाण्याची आबाळ, स्थानकावरील शौचालयांची दुरवस्था ताणामध्ये भरच घालतात.

हे झाले कामाच्या दिवसांचे. दिवसा व रात्री रोज चार तास अशा ताणातून जाणाऱ्या महानगैरवासीयांना ताणमुक्तीसाठी ही शहरे नेमके काय देतात? अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गैरजा भागवता मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांना श्वास घ्यायला मोकळ्या जागा आणि सांस्कृतिक गैरजा पूर्ण करण्याचे पर्यायच सापडत नाहीत. उपनगरात तर त्यांची भीषण वानवा. सुट्टीच्या दिवशी ताण निवळण्यासाठी शहराच्या दुसऱ्या टोकाला किंवा शहराबाहेर जाणे मुंबईकर टाळतात. कारण वाहतुकीची अपुरी साधने, कोंडी यामुळे तिथे जाणे येणे हेच ताण वाढवणारे असते.

हे झाले केवळ प्रवास या घटकाचे. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक निकषावर याप्रमाणे बोलता येईल. आपण यात इतके मागास की शहरांच्या पुढील वीस वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार करतानाही शहराच्या आनंद निर्देशांकाचा फारसा विचार करत नाही.

मुंबई महानगैरपालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या पाहणीतून मनोविकार वाढल्याचे लक्षात येत आहे. मनोविकारासाठी शरीरातील जीन्सची रचना कारणीभूत असते आणि प्रत्येकाच्याच शरीरात कमी अधिक प्रमाणात मनोविकार सुप्तावस्थेत असतात. मात्र आजूबाजूच्या घटना, परिस्थिती, अतिताण यामुळे मग सुप्तावस्थेतील हे आजार बळावतात आणि नैराश्य, अस्वस्थता, दुभंग व्यक्तिमत्त्व असे आजार सुरू होतात. महापालिकेच्या रुग्णालयातील परिस्थिती थेट सर्वसामान्यांना लागू होणार नाही. मात्र ती आपल्या शहरांच्या भावनांचा निर्देशांक दाखविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. प्रश्न आहे की आता तरी आपण याची दखल घेणार आहोत का?