कांदिवलीच्या ठाकूर संकुलातील प्रथित इमारतीतील बिघडलेल्या लिफ्टची दुरुस्ती करीत असताना लिफ्टमध्ये डोके अडकून कृष्णकांत झा यांचा मृत्यू होता. विशेष म्हणजे झा लिफ्ट दुरुस्त करणाऱ्या ‘के.पी. लिफ्ट अ‍ॅण्ड इंजिनिअरींग वर्क्‍स’ या कंपनीचे मालक होते. समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी झा (४८) प्रथित इमारतीच्या सी विंगमधील बिघडलेली लिफ्ट दुरूस्तीसाठी आले होते. पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर त्यांनी लिफ्ट आणली. तेथेच त्यांचे डोके भिंत आणि लिफ्ट यामध्ये अडकले. दुरुस्ती सुरू असताना अचानक लिफ्ट सुरू झाली. त्यांचे डोके लिफ्टमध्ये अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader