मुंबई : मुंबईतील शिवसेनेच्या दोन गटांनी आयोजित केलेल्या दोन स्वतंत्र दसरा मेळाव्यांसाठी राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. दादरच्या शिवाजी पार्कप्रमाणेच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावरही दुपारपासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. कडक उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी कार्यकर्ते हैराण झाले आहेत. मात्र, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात दुपारी पावसाच्या तुरळक धारा बरसल्याने कार्यकर्त्याना सुखद गारवा मिळाला.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने दादर दुमदुमले

हेही वाचा… Dasara Melava 2022: “अगोदर पेपर फोडणार नाही पण…” शिंदे गटाच्या मेळाव्याबाबत अर्जुन खोतकरांचं सूचक विधान

मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये सकाळपासून येत असल्याने एमएमआरडीए मैदानात वडापाव, पुलाव-बिर्यानीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकीकडे बिर्यानीच्या मेजवानीची तयारी सुरू असतानाच शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी तीन ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाजी पार्क मैदानावरील मॉसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ, राजा बडे चौक आणि सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळील परिसरात शिवसैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणामध्ये दाल खिचडी, अमूल ताक आणि पाण्याची बाटली देण्यात येत होती.

Story img Loader