मुंबई : मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून वाहतूक आणि रेल्वे सेवा कोलमडली होती. यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान, मुंबईत मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई तसेच उपनगरांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची पुरती दैना उडाली. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे कोलमडली, तर शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी, नोकरदार वर्गाला कार्यालये गाठताना कसरत करावी लागली होती. दरम्यान, मुंबईत मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच सोमवारी मध्यरात्री फारसा पाऊस पडला नाही. मुंबईतील पावसाचा जोर सोमवारी सायंकाळपासून कमी झाला. सोमवारी सकाळी ८.३० पासून मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १६१.२ मिमी, सांताक्रूझ येथे १५४.२ मिमी, भायखळा येथे १६७ मिमी, माटुंगा येथे १६७.५ मिमी, दहिसर येथे ११३ मिमी, राम मंदिर येथे १५६ मिमी, विक्रोळी येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली.

हेही वाचा >>>कॅनडाच्या व्हिसाच्या नावाखाली ४० हून अधिक जणांची फसवणूक

अफवांवर विश्वास ठेवू नये

मुंबईत मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) अंदाज व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, मुंबईसाठी आज असा कोणताही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईत सोमवार, ८ जुलै रोजी सायंकाळी अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light to moderate rain forecast in mumbai throughout the day mumbai print news amy
Show comments