लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: पुण्यात काही दिवसांपूर्वी कोयता टोळीची दहशत होती. मुलुंड परिसरात देखील हातात कोयता आणि चाकू घेऊन एका गुंडाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला अटक केली आहे.

आणखी वाचा-किनारामार्ग मोकळा!; कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखडय़ास केंद्राची मंजुरी

मुलुंडच्या अंबिका नगर परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. एक गुंड हातात कोयता आणि चाकू घेऊन रिक्षा चालक आणि दुकानदारांना धमकावत होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोघांना त्याने जखमी केले. काही रहिवाशांनी तत्काळ मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक कोयता आणि एक चाकू हस्तगत केला असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.