What is You Tube Channel Like And Subscribe Scam : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पैसा मिळवा ही जाहिरतही सातत्याने समाज माधमावर दिसते आहे. या घोटाळ्यात मुंबईच्या एका फॅशन डिझायनरची तब्बल १० लाखांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार आली होती. युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचा पार्ट टाईम जॉब देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. खासगी कंपनीत काम करणारा सुमित गुप्ता (३६) आणि झेरॉक्स मशीन रिपेअरचं काम करणारा पार्थ पांचाळ (२५) या दोघांकडून हा घोटाळा सुरू होता.

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड
robbers enter in company manager house in Khasala Mhasala stole cash and jewelry
नागपुरात थरार! कपिलनगरात कुटुंबीयांना ओलिस ठेवून दरोडा, अधिवेशनादरम्यान घटना घडल्याने खळबळ
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”

४६ वर्षीय फॅशन डिझायनर विलेपार्ले येथे राहते. तिने ७ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला. या पीडितेला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे मिळवा अशी जाहिरात होती. मेसेज करणाऱ्या मुलीचं नाव दिव्या होतं. व्हॉट्सअॅपवर असा मेसेज आल्यानंतर पीडिता आणि दिव्या (आरोपी) यांच्यात टेलिग्रामवर संवाद सुरू झाला. पीडितेला या कामाप्रती विश्वास वाटल्याने तिने हे काम सुरू केले. कामाला सुरुवात करताच दिव्याने तिच्याकडून तिची बँक खात्याची माहिती मागवली. केलेल्या कामाची रक्कम देण्याकरता बँक खात्याची माहिती मागवण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे पीडितेच्या खात्यावर पैसेही ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर, एक लिंक पाठवून तिथं प्रोफाईल तयार करायला सांगितली. जेणेकरून त्या लिंकवरील ऑनलाईन वॉलेटमध्ये तिच्या कामाचे पैसे जमा होतील.

हेही वाचा >> मुंबईतील महिलेने १०० कोटींची मालमत्ता भावंडांच्या नकळत विकली! चाळीतील भाडेकरू व विकासकालाही चुना

अशी झाली फसवणूक

पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर दिव्याने तिला या व्यवसायत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या गुतंवणुकीतून तिला ३० ते ४० टक्के देण्याचं आश्वासन दिलं गेलं. त्यामुळे पीडितेने या व्यवसायात गुंतवणूक करायला सुरुवात केली. या गुंतवणुकीतून तिला नफाही मिळू लागला. परंतु, हा नफा तिच्या ऑनलाईन वॉलेटमध्ये जमा होत होता. या ऑनलाईन वॉलेटमधून पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करता येत नव्हते. यासंबंधित तिने दिव्याशी संपर्क साधला असता तिने आणखी पैशांची मागणी. त्यावेळी पीडितेला आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं. तोवर पीडितेने या व्यवसायात १०.६७ लाखांची गुंतवणूक केली होती. त्यामुळे तिने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा >> २७ ऑक्टोबरपासून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास वाढणार! अकरा दिवस २५०० हुन अधिक ट्रेनच्या फेऱ्या रद्द

दिव्याच्या खात्यात पैसे जमा झाले असून याप्रकरणात दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पार्थ पांचाळला गुजरात पोलिसांनी अटक केली. तसंच, आरोपीच्या खात्यातील ६ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.

Story img Loader