अनिश पाटील
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा देण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द आता सिंधुदुर्गापर्यंत वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.प्रस्तावानुसार सध्या कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुंबई रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात येणार असून त्यासाठी कोकणात तीन नवी रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार आहे. ४४७ किलोमीटरच्या या अतिरिक्त मार्गाच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे पोलीस उपायुक्त हे पद निर्माण करण्यात येणार आहे. तर कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी ८०० पोलिसांचे संख्याबळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेसाठी ८०० पोलिसांचा प्रस्ताव
कोकण रेल्वेच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे पोलीस उपायुक्त हे नवे पद निर्माण करण्यात येणार आहे. या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ८०० पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. कोकण रेल्वे पोलीस उपायुक्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत काम करतील.