मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफरीमध्ये तब्बल १४ वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. सिंह सफारीमधील ‘मानसी’ नावाच्या मादी सिंहाने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. सिंहाची ही जोडी २०२२ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. मात्र, या जोडीमध्ये ताणतणाव असल्यामुळे त्यांच्यात मिलन होत नव्हते.

मध्यंतरी मानसी आजारी होती. दरम्यान, मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तपासणीअंती मानसी गरोदर असल्याचे समजले. गुरुवार, १६ जानेवारी रोजी रात्री मानसीने एका छाव्याला जन्म दिला. छावा आणि मानसी दोघे सुखरूप असून सध्या दोघेही वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.

Protesters in Shivaji Park Dadar question Mumbai Municipal Corporation administration regarding underground parking at Breach Candy Mumbai news
ब्रिचकँडीच्या रहिवाशांचे ऐकता मग शिवाजी पार्कवाल्यांचे का नाही; शिवाजी पार्कच्या आंदोलनकर्त्यांचा सवाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shahrukh Khan mannat house saif ali khan attacker
Shah Rukh Khan’s house recced: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही केली होती रेकी, पोलिसांची माहिती
Saif Ali Khan's attacker detained by Mumbai Police
Saif Ali Khan Stabbed Case: सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा सापडला? मुंबई पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू!
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
son taimur accompanied saif ali khan to hospital
इब्राहिम नव्हे तर ८ वर्षीय तैमूरने वडिलांना रुग्णालयात नेलं; सैफ अली खानच्या डॉक्टरांची माहिती, म्हणाले…

हेही वाचा…ब्रिचकँडीच्या रहिवाशांचे ऐकता मग शिवाजी पार्कवाल्यांचे का नाही; शिवाजी पार्कच्या आंदोलनकर्त्यांचा सवाल

दरम्यान, संजय गांधी राष्ट्री उद्यानात २००९ मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ मध्ये गोपा आणि रवींद्र, तसेच जेप्सा यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. याचदरम्यान २०२२ मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.

Story img Loader