ठाणे शहराचे उपअंग असलेल्या कळवा, खारेगाव भागात वीजचोरीचे प्रमाण वाढत असल्याने या भागात वीज भारनियमन लागू करण्याचा विचार महावितरणचे अधिकारी करीत आहेत. गेल्या महिन्यात कळवा, खारेगाव भागातून ३४ वीज चोरांविरुद्ध कारवाई करून महावितरणने ९ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या खारेगाव, कळवा १, कळवा २ या फिडरवरून मोठय़ा प्रमाणात वीजचोरी होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही वीजचोरी अशीच सुरू राहिल्यास नाइलाजाने या भागात वीज भारनियमन लागू करावे लागेल, असा विचार महावितरणचे अधिकारी बोलून दाखवीत आहेत.
खारेगाव, विटावा, शांतीनगर, आनंदनगर, ईश्वरनगर, गणपतीपाडा. सूर्यानगर परिसरात या वीजचोरीमुळे भारनियमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा