उपनगरीय रेल्वे सेवेचा खोळंबा कायम असून सोमवारीही सायंकाळी या प्रकाराची पुनरावृत्ती घडली. मुंबईहून कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ऐन सायंकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुमारे अर्धा तास धिम्या मार्गावरून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतुक विस्कळीत झाली होती.
कोपर स्थानकात सायंकाळी सात वाजता पोहचलेल्या कल्याण लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी या स्थानकात पंचवीस मिनीटे थांबवून ठेवण्यात आली होती. यामुळे धिम्या मार्गावरील लोकलची वाहतुक सेवा खोळंबली होती. या घटनेमुळे पाठीमागून येणाऱ्या लोकल गाडय़ा मुंब्रा स्थानकावरून जलदमार्गावर वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवा स्थानकात पोहचणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली स्थानकामध्ये जावे लागले. डोंबिवलीतून पुन्हा दिवा असा परतीचा प्रवास करावा लागला. या प्रकारामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना रखडलेल्या लोकलचा त्रास सहन करावा लागला.    

Story img Loader