बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तीन म्हशींचा मृत्यू झाला. तर एक म्हैस मृत्यूशी झुंज देत आहे. सायंकाळी झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांचा २० ते २५ मिनिटे खोळंबा झाला. सायंकाळी ६.३०च्या दरम्यान बदलापूरहून निघालेली लोकल अंबरनाथ स्थानकात येत असताना हा प्रकार घडला. लोकलच्या मार्गात चार म्हशी आल्याने त्यांना लोकलची धडक बसली. यात तीन म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाली. या अपघातामुळे त्या लोकलमागून येणारी उद्यान एक्स्प्रेस २० मिनिटे अडकून पडली होती.

Story img Loader