मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकल सेवा खोळंबली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कडाक्याची थंडी पडली असून त्याचा परिणाम रेल्वे रुळावर होऊ लागला आहे. बदलापूर येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लोकल एका मागोमाग एक उभ्या होत्या. रुळाला तडा गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. तसेच तातडीने रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावर प्रतितास १० किमी वेगमर्यादा ठेवण्यात आली होती.

हेही वाचा – हिंदुत्व, कल्याणकारी योजनांचे मिश्रण; उत्तर मध्य मुंबईत महायुतीची सरशी

हेही वाचा – VIDEO : मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी? मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट; तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

दुरुस्तीचे कामे पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग प्रतितास ३० किमी इतका ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय कामे पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग सामान्य केला जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मध्य रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे वातानुकूलित लोकल, सामान्य लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच अनेक मेल-एक्स्प्रेस, मालगाडी खोळंबल्या होत्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local service was disrupted due to a crack in railway track between badlapur railway station on central railway local trains running late mumbai print news ssb