मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.गुरुवारी सकाळपासून उपनगरात पाऊस धारा सुरू आहेत. त्यामुळे कार्यालयात लवकर पोहचण्याच्या उद्देशाने प्रवासी घरातून लवकर बाहेर पडले. मात्र सकाळी ६.५० च्या दरम्यान बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी वेळेत पोहचणे अवघड झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. चर्चगेटच्या दिशेला जाणाऱ्या जलद आणि धीम्या दोन्ही मार्गिका विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, बोरिवली येथे पॉईंटमध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. सध्या लोकल१० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला.