पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरीजवळ जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुटल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्य़ा धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. पश्चिम रेल्वेतर्फे ताबडतोब दुरूस्तीचे काम हाती घेऊन सव्वाबाराच्या सुमारास वाहतूक पुर्ववत करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन महातपूरकर यांनी दिली. दरम्यान, वाहतूकीला याचा फटका बसून गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशीराने धावत होत्या. मात्र, सव्वाबारानंतर वाहतूक सुरळीत झाली.   

Story img Loader