वाशी ते मानखुर्द रेल्वे मार्गावरील रुळांना तडे गेल्याने या मार्गावरील लोकल अर्धा तास उशीराने धावत आहेत. ऐन सकाळच्यावेळी ही घटना घडल्याने मुंबईकडे जाणाऱया नवी मुंबईतील अनेक चाकरमान्यांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. 
लोकल उशीरा धावत असल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर होणार आहे. लोकल उशीराने धावत असल्यामुळे वाशीपासून पनवेलपर्यंत आणि मानखुर्दपासून पुढील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. उन्हाळा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रेल्वे रुळांना तडे गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. मुंबईकडून पनवेलकडे जाणारी लोकल वाहतूक सुरळीत आहे.

Story img Loader