कसारा रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या उपनगरी रेल्वेच्या एका डब्याला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये कोणाही जखमी झाले नसले तरी मुंबईकडे येणारी वाहतूक रात्री विस्कळीत झाली होती. रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या उपनगरी गाडय़ाच्या महिलांच्या डब्यामध्ये अचानक आग लागली. आग काही वेळातच आटोक्यात आणण्यात आली. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान आगीमुळे  मुंबईकडे निघालेली ही गाडी रद्द करण्यात आली. त्याशिवाय मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ाही कसारा रेल्वे स्थानकापूर्वीच थांबविण्यात आल्या. तसेच मुंबईहून कसाराकडे जाणारी वाहतूक आसनगाव आणि खर्डी स्थानकापर्यंतच सुरू होती.

Story img Loader