वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून रेल्वेमार्ग ओलांडण्याची घोडचूक मध्य रेल्वेच्या तीन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना भारी पडली. परळ आणि करीरोड या स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना लोकलने या तिघांना धडक दिली. या अपघातात एक कर्मचारी ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कार्यशाळेत काम करत होते.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारे मोहन सरोदे (२१), शुभम महाजन (१९) आणि पवन सपकाळ (२४) हे तिघे सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास काम आटपून निघाले. हे तिघेही डोंबिवली येथे राहणारे आहेत. मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकात येऊन गाडी पकडण्याऐवजी या तिघांनी मधूनच रेल्वेमार्गावर चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, करीरोड आणि परळ या स्थानकांदरम्यान मुंबईहून कुल्र्याला जाणाऱ्या लोकलने त्यांना उडवले. तिघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान पवन सपकाळ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मोहन आणि शुभम हे दोघे गंभीर जखमी आहेत.

Story img Loader