गाडय़ांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे आश्वासन देत प्रवाशांना सुखकारक प्रवास घडविण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा गेल्या वर्षभरात तब्बल २,३२८ वेळा निरनिराळ्या कारणांमुळे खोळंबा झाला आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वे रूळांना तडे जाणे, गाडय़ा बंद पडणे आदी विविध कारणांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला आहे.
मुंबईतील सुमारे ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून दरवेळी सुखकर प्रवासाची स्वप्ने दाखविण्यात येतात. कधी गाडय़ांच्या फेऱ्या वाढवून, कधी सुखकारक प्रवासासाठी आधुनिक गाडय़ा आणून तर कधी विविध योजनांच्या घोषणा करून प्रवाशांना भुलविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रकार सातत्याने होऊ लागले आहेत. गाडय़ा अचानक बंद पडणे, सिग्नल यंत्रणा नादुरूस्त होणे, ओव्हरहेड वायर तुटणे, त्यात पेंटोग्राफ अडकणे आदी प्रकार घडू लागले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गेले किमान दीड दशक सातत्याने दर रविवारी मेगा ब्लॉक घेऊन , उपनगरी गाडय़ांची वाहतूक विस्कळीत करून रेल्वे नक्की करते तरी काय, हा लाखमोलाचा प्रश्न प्रवाशांना पडला आहे . मध्य रेल्वेवर २००८ आणि २००९ मध्ये ओव्हरहेड वायर तुटून सर्वाधिक वेळा वाहतूक विस्कळीत झाली होती. २०१० मध्ये गाडय़ा बंद पडण्याचे प्रकार अधिक घडले होते, तर २०११ आणि २०१२ मध्ये सिग्नल यंत्रणेत सर्वाधिक बिघाड होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती, असे भाजप कार्यकर्ते डॉ. संतोष पाचलग यांनी रेल्वेकडून माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीच्या आधारे उजेडात आले आहे. वरील आकडेवारी बघितल्यास गेल्या पाच वर्षांत तब्बल ९,०९४ वेळा गाडय़ांच्या सेवांध्ये व्यत्यय आल्याचे या तक्त्यावरून स्पष्ट होत आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक याच कारणामुळे वारंवार विस्कळीत झाली होती. परंतु नेमकी किती वेळा वाहतूक विस्कळीत झाली आणि त्या मागची कारणे काय याची माहिती देण्यास पश्चिम रेल्वेने असमर्थता दर्शविली.
local train of mumbai delayed  2328 times in a year
local train , mumbai local,
मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाची ऐशी की तैशी !
प्रसाद मोकाशी, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip