मुंबई : दहिसरमध्ये मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या राडारोडा प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रकल्प अजून पूर्ण क्षमतेने सुरूही झालेला नसताना हा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी प्रसारमाध्यमांच्या दौऱ्यातच स्थानिक नागरिकांसह शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेवक पतीपत्नींनी प्रकल्पस्थळी येऊन प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पाच्या ठिकाणी रस्त्यांच्या सुविधा नसताना हा प्रकल्प सुरू केल्यामुळे स्थानिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे, तसेच प्रदूषणही होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करावे व नंतर प्रकल्प चालवावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले.

घराघरातून बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबई महापालिकेने दहिसर व कल्याण येथे असे दोन प्रकल्प सुरू केले आहेत. त्यापैकी दहिसर येथील प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रसार माध्यमांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी परिसरातील काही महिलांनी प्रवेशद्वारावरच घेराव घातला होता. प्रसारमाध्यमांच्यासमोर या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दहिसरच्या कोकणीपाडा परिसरातील नागरिक जमले होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक पतीपत्नी सुजाता व उदेश पाटेकर हे या नागरिकांसह घटनास्थळी विरोध करण्याकरीता आले होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची मोठीच पंचाईत झाली.

nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Anand Dighe and Balasaheb Thackeray
Private:
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?

हेही वाचा…घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा

या प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ पसरणार असून वायू प्रदूषणही वाढणार आहे, त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे मत यावेळी भारती तांडेल यांनी व्यक्त केले. तर कोकणीपाड्यावरील प्रकल्पाकडे जाणारा रस्ता हा अतिशय निमुळता आहे. या रस्त्यावरून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. त्यामुळे कंत्राटदाराने आधी रस्ता तयार करावा मगच प्रकल्प चालवावा असे मत चंद्रकांत परब यांनी मांडले.

यावेळी बोलताना माजी नगरसेविका सुजाता पाटेकर म्हणाल्या की, या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ६०० टन राडारोडाची आहे. म्हणजे संपूर्ण मुंबईत राडारोडा आणण्यासाठी दररोज किती ट्रक या रस्त्यावरून येजा करणार याची कल्पना येईल. या रस्त्याची तितकी क्षमता नाही. तसेच भविष्यात या ठिकाणी राडारोडाबरोबरच कचराही आणला जाईल आणि याची कचराभूमी तयारी होईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरीकरण: आठपदरीकरणाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा

प्रकल्प सुरू झाल्यानंतर विरोध केल्याबद्दल पाटेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूकीच्या काळात प्रशासनाने हा प्रकल्प सुरू केला. त्या आधी हा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत पालिकेने गुप्तता पाळली होती. आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. या ठिकाणी आधी खदान होती. त्यामुळे खाण बंद झाल्यानंतर काही काळ याठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरणही केले जात होते. त्यातच अचानक हा प्रकल्प सुरू झाला. कोकणीपाडा हा निसर्गाच्या सान्निध्यातला भाग असून या ठिकाणी आदिवासी वसाहत आहे. मात्र प्रकल्पामुळे त्यांचाही रस्ता बंद झाला आहे. या ठिकाणी आधीच अरुंद रस्त्यामुळे लहान मुलांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवू नये अशी भूमिका पाटेकर यांनी मांडली.

Story img Loader