मंत्रालयातील संगणकीय प्रणालीवरील विषाणूचा सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाला फटका
लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता. ‘सिस्टीम’मध्ये व्हायरस शिरला आहे आणि युद्धपातळीवर सिस्टीमची सफाई सुरू झाली आहे, एवढेच तोवर त्यांच्या कानावर आले होते. त्यामुळे सूचक हसत अनेकजण एकमेकांना टाळ्या देत होते. हे कधी तरी होणारच होते, अशीही कुजबुज सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा मंत्रालयातील महसूल खात्याकडे लागल्या होत्या. या खात्यात संगणकीकरणाचा धूमधडाका सुरू होता. त्यामुळे तेथे एखाद्या सिस्टीममध्ये व्हायरस आला असावा, असा तर्कही काहींनी बांधला. पण काहींनी लगेचच तो धुडकावून लावला. सगळी सिस्टीमच खराब झाली आहे, असा शेराही कुणी तरी मारला. मंत्रालयाच्या मजल्यामजल्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनताजनार्दनाच्या कानावरही ही कुजबुज पडली, पण कुणाच्याच चेहऱ्यावर आश्चर्य दिसत नव्हते. ही बाब एवढय़ा उशिरा कशी समजली, असा सवाल ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या एका ग्रामस्थाने भोळसटपणे एका कक्षातील कर्मचाऱ्याकडे केला, तेव्हा कसेबसे हसून त्या कर्मचाऱ्याने मान वळविली.गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयातील यंत्रणेच्या कर्तबगारीच्या कहाण्या जगजाहीर होत होत्या. लाचलुचपत खात्याचे कर्मचारी तर गुप्तपणे मजल्यामजल्यावर पाळत ठेवून असल्याची चर्चा होती. संध्याकाळी सारा प्रकार स्पष्ट झाला. मंत्रालयातील संगणक यंत्रणेत विषाणू संसर्ग झाला, आणि त्यामुळे यंत्रणा थंडावली, हे समजताच अनेक कर्मचाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला.
लॉकी रॅन्सम काय आहे?
व्हायरस आकर्षक माहिती देणाऱ्या ई-मेल्सच्या माध्यमातून संगणकात प्रवेश करतो. त्यानंतर दहा मिनिटांच्या आत संपूर्ण संगणक लॉक होतो. तसेच संगणकातील सर्व माहिती एनक्रिप्टेड होते. या एनक्रिप्टेड माहितीची चावी व्हायरस सोडणाऱ्याच्या सव्र्हरवर असते अशी माहिती क्विकहील टेक्नॉलॉजीचे सीओओ संजय काटकर यांनी दिली.
कर्मचाऱ्यांमध्ये ‘व्हायरस’चीच चर्चा
लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2016 at 02:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locky ransom virus hits maharashtra mantralaya computers