मुंबई: ठाणे- मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकर (टोल)चा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाचही नाक्यांवरून गोळा केलेली माहिती सहा महिन्यांनंतरही जाहीर करण्यात मनसेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला बसताच ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे- मुंबईकरांना भेडसावणाऱ्या पथकराच्या समस्येचा सोयीस्करपणे विसर तर पडला नाही ना अशी चर्चा रंगली आहे. 

मुंबई तसेच ठाणे आणि परिसरातील वाहनधारकांना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकराच्या समस्येचा गेल्या काही वर्षांपासून सामना करावा लागत आहे. मुंबईतील उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ऐरोली, आनंदनगर, मुलुंड, दहिसर तसेच वाशी आदी ठिकाणी पथकर वसूल केला जातो. मात्र हा पथकर वसूल करणाऱ्या ठेकेदारमार्फत पथकर नाक्यावर मूलभूत सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. तसेच पथकर नाक्यावरील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या लागलेल्या रांगांमुळे लोकांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते. त्यातच ऑक्टोबरमध्ये या नाक्यावरील पथकरात वाढ करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पथकरवाढ मागे घेण्यासाठी ठाण्यात आंदोलन केले होते. पक्षाचे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव पथकराच्या त्रासातून ठाणेकरांची सुटका करण्याची मागणी करीत उपोषणही केले होते. पथकराच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेत पथकर नाके जाळून टाकण्याचा इशारा सरकारला इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार राजशिष्टाचार बाजूला ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी थेट ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेत या प्रश्नावर महिनाभरात तोडगा काढण्याची घोषणा केली होती.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा >>> सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर; डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

या बैठकीत  १५ दिवसांसाठी सरकारसह मनसेतर्फे मुंबई प्रवेशद्वारावरील पथकर नाक्यावर कॅमेरे बसवून दररोज किती गाडयांची ये-जा होते यासह इतर माहिती गोळा करणे, या कॅमेऱ्यांसाठी मंत्रालयात कक्ष सुरू करणे,  प्रत्येक नाक्यावर असलेल्या पिवळया पट्टीच्या पलीकडे गाडयांची रांग गेल्यास सगळया गाडया पथकर न घेता सोडल्या जातील. चार मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबवणार नाही. ही सगळी यंत्रणा पोलिसांमार्फत राबवणे, पथकर नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर एकदाच पैसे घेणे, पथकर नाक्यावर सर्व सोयीसुविधा, स्वच्छ प्रसाधनगृहाची सोय करणे आणि सर्वेक्षण अहवालानुसार एक महिन्यात वाढीव पथकर आणि ठाणेकरांना पथकरातून दिलासा देण्याबाबचा निर्णय सरकार घेईल अशी घोषणा बैठकीनंतर ठाकरे आणि भुसे यांनी केली होती.

या सर्वेक्षणाचा अहवाल मनसेने तयार केला. पक्षाने घेतलेल्या आढाव्यानंतर या टोलनाक्यांवर पाच पट अधिक वाहने ये- जा करीत असून सरकार सांगत असलेला वाहनाचा आकडा चुकीचा असल्याचा दावा करीत याबाबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचे पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीर केले होते.

हा अहवाल मुख्यमंत्र्याना देऊन मुंबई- ठाणेकरांना  पथकरातून दिलासा मिळवून देण्याचा आणि त्याचा राजकीय लाभ घेण्याचा मनसेचा प्रयत्न होता. बदललेल्या राजकीय घडामोडीतून ठाकरे यांनाच सरकारच्या पंक्तीला बसावे लागले. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे मनसेनेला आता पथकर प्रश्नाचा विसर पडल्याचे सांगितले जात आहे.

पथकर नाक्यावरील वाहने आणि पथकर वसुली याबाबतची आकडेवारी मनसेने गोळा केली असून त्याचा अहवाल सरकारला देण्यात आला आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द सरकारकडून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय लांबला असला तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पश्न मनसे तडीस लावेल .    – अविनाश जाधव, मनसे नेते