मुंबई : विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांतील मतदान पार पडले व दुसऱ्या टप्प्यात आठ मतदारसंघांतील मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले तरी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या दोन्ही गटांनी जाहीरनामे अद्यापही जाहीर केलेले नाहीत.

 भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे केव्हाच प्रसिद्ध झाले. राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट तर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगवेगळे गट आहेत. अजित पवार गटाने बारामती, शिरुर, रायगड, उस्मानाबाद या चार मतदारसंघांमध्ये आतापर्यंत उमेदवार जाहीर केले आहेत. परभणीची जागा मित्रपक्ष जानकर यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. चारपैकी शिरुरमधील शिवाजीराव आढळराव पाटील आणि उस्मानाबादमधील अर्चना पाटील हे दोन उमेदवार आयात करण्याची वेळ अजित पवार गटावर आली आहे. साताऱ्याची जागा भाजपने बळकावली. नाशिकसाठी पक्षाचा आग्रह होता, पण छगन भुजबळ यांनी माघार घेतली. एकूणच महायुतीत अजित पवार गटाची अवस्था दयनीयच झाली आहे.

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Dhananjay Munde. Ajit Pawar , Maratha Kranti Morcha,
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!

हेही वाचा >>> नाशिकच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन विद्यमान खासदारांना भाजपच्या दबावामुळे उमेदवारी नाकारण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपने बळकावली. ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.  महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाटयाला सर्वाधिक जागा आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दहा जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. अजित पवार गटापेक्षा अधिक जागा मिळल्याचा आनंद शरद पवार गटाला अधिक आहे.   काँग्रेसची अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे. पक्षाला अपेक्षित असलेल्या सांगली, भिवंडी, वर्धा या जागा मित्रपक्षांना सोडण्याची वेळ पक्षावर आली. महाविकास आघाडीत १७ जागा काँग्रेसच्या वाटयाला आल्या आहेत.  महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला अद्याप नक्की किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नसल्याने दोन्ही पक्षांची अवस्था सध्या काहीशी अवघडल्यासारखी झाली आहे.

पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवारच नव्हते. येत्या दोन दिवसांत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, असे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शरद पवार गटाच्या वतीने गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.  पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचा रामटेकमध्ये उमेदवार रिंगणात होता. पण मतदान पार पडले तरी जाहीरनामा शिंदे गट प्रसिद्ध करू शकलेला नाही.

अजित पवार गटाकडून आज प्रकाशन

अजित पवार गटाचा आज जाहीरनामा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जाहीरनामा उद्या, सोमवारी प्रकाशित केला जाणार आहे. पक्षाने जाहीरनाम्याची सारी तयारी केली होती, पण महायुतीत पक्षाच्या वाटयाला नक्की किती जागा येणार याची स्पष्टता नसल्याने राष्ट्रवादीने थांबा आणि वाट पाहा ही भूमिका घेतली होती. दुसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येऊन ठेपल्याने जाहीरनामा अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे.

Story img Loader