‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेची महाअंतिम फेरी अलीकडेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात जल्लोषपूर्ण वातावरणात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडली. आठ सर्वोत्तम एकांकिका पाहण्यासाठी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना ऐकण्यासाठी नाटय़प्रेमींची झुंबड उडाली होती. इच्छा असूनही जागेअभावी अनेकांना आल्या पावली परतावे लागले होते; परंतु नाटय़प्रेमींची हीच निकड लक्षात घेऊन ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या महाअंतिम फेरीत नाटय़वेडय़ा तरुणांकडून सादर करण्यात आलेल्या आठही एकांकिका आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी तब्बल एक तास विद्यार्थ्यांना दिलेले नाटय़ाविष्काराचे नवे धडे आणि त्यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ indianexpress-loksatta.go-vip.net आणि यूटय़ूब चॅनल http://www.youtube.com/loksattalive येथे हे व्हिडीओ पाहता येणार आहेत.

महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची लोकांकिका ठरलेली औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठ नृत्यविभागाची ‘भक्षक’, द्वितीय ठरलेली अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’ व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणारी मुंबईच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘एक्सप्रीमेंट’ या एकांकिकांसोबतच ठाण्याच्या ज्ञानसाधनाची ‘मित्तर’, नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाची ‘व्हॉट्सअॅप’, पुण्याच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘जार ऑफ एल्पिस’, नागपूरच्या विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालयाची ‘विश्वनटी’ व रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकरची ‘भोग’ एकांकिकावर िलकवर आहेत. सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पध्रेसाठी ‘अस्तित्व’ संस्थेचेही महत्त्वाचे योगदान लाभले. पॉवर्ड बाय ‘केसरी’- ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभले होते. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या कार्यक्रमाचे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले होते.

Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
first time in history of Maharashtra 52 separate hostels for OBCs and vagabonds 5 thousand 200 students admitted
५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
vile parle vidhan sabha election 2024
विर्लेपार्ले विधानसभा मतदार संघ: झोपड्यांचे पुनर्वसन, विमानतळ फनेल झोनसह अनेक समस्या ‘जैसे थे’, समस्यांकडे लक्ष देण्याची मतदारांची मागणी

‘बदलता महाराष्ट्र’ ‘यूटय़ूब’वर
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या ‘आपण आणि पर्यावरण’ परिषदेचेही व्हिडीओ ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ आणि यूटय़ूब चॅनलवर उपलब्ध आहेत. विविध पातळ्यांवर पर्यावरण संवर्धनाचे काम करणारे अभ्यासक व कार्यकत्रे यांच्यासाठी प्रेरणास्थान असलेल्या जलदूत राजेंद्र सिंह यांच्याकडूनच थेट त्यांच्या अनुभवाचे बोल त्यांच्या खास शैलीत व्हिडीओ स्वरूपात पाहायला आणि ऐकायला मिळतील. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परिषदेत केलेले संपूर्ण भाषणही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ने टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेला रिजन्सी ग्रुप आणि ‘केसरी’चीही मदत मिळाली होती.