‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेची महाअंतिम फेरी अलीकडेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात जल्लोषपूर्ण वातावरणात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडली. आठ सर्वोत्तम एकांकिका पाहण्यासाठी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना ऐकण्यासाठी नाटय़प्रेमींची झुंबड उडाली होती. इच्छा असूनही जागेअभावी अनेकांना आल्या पावली परतावे लागले होते; परंतु नाटय़प्रेमींची हीच निकड लक्षात घेऊन ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या महाअंतिम फेरीत नाटय़वेडय़ा तरुणांकडून सादर करण्यात आलेल्या आठही एकांकिका आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी तब्बल एक तास विद्यार्थ्यांना दिलेले नाटय़ाविष्काराचे नवे धडे आणि त्यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ indianexpress-loksatta.go-vip.net आणि यूटय़ूब चॅनल http://www.youtube.com/loksattalive येथे हे व्हिडीओ पाहता येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा