सहारा उन्नत मार्गावरील भुयारी मार्गाच्या आरंभी कसलाच सूचना फलक वा दिशादर्शक फलक नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने निदर्शनास आणल्यानंतर याची गंभीरपणे दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आता दिशादर्शक सूचना फलक लावण्यात आला आहे. तसेच महामार्गावरील अर्धवट दुभाजकाचे कामही सुरू करण्यात आले आहे आणि नेमकी आवश्यकता लक्षात घेऊन दुभाजकाची लांबही वाढविण्यात येते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिशादर्शक फलक नसल्याने अनेक वाहनधारक चुकून भुयारी मार्गाकडे जात असून, आपण भलत्याच रस्त्यावर आल्याचे लक्षात आल्यावर ते परत फिरण्यासाठी वळतात. या गडबडीत भुयारी मार्गाच्या तोंडावरच वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे लोकसत्ता डॉट कॉमने काही दिवसांपूर्वी चित्रफितीसह उघडकीस आणले होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या ‘टर्मिनल २’ या नवीन टर्मिनलच्या बरोबरीने उन्नत मार्ग प्रकल्प सुरू झाला. दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली मार्गिका वाहनांना उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी रस्त्याकडे नेते. पण त्या मार्गिकेच्या आरंभी कसलाही सूचना फलक नव्हता. केवळ मार्गिका सुरू होते त्या ठिकाणी प्लास्टिकचे दुभाजक लावण्यात आलेले आहेत. परिणामी रस्त्याच्या उजव्या बाजूने येत असलेल्या वाहनधारकांची गल्लत होत होती. ते चुकून थेट भुयारी मार्गाकडे जात. समोर भुयारी मार्ग दिसताच त्यांना गल्लत झाल्याचे लक्षात यायची आणि ते परत द्रुतगती महामार्गावर येण्यासाठी मागे वळायचे. या संबंधीची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली होती.

(सर्व छायाचित्रे – वसंत प्रभू)