मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या विरोधात केलेली तक्रार लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे.

अनिल परब यांच्या रिसोर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे सुनावणी झाली होती. लोकायुक्तांनी दोन मुद्दय़ांवर ही तक्रार फेटाळून लावली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Impeachment motion against Yoon Suk Yeol rejected south Korea
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा; यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव नामंजूर

महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यातील कलम ८(१)(ब), आणि कलम १०(४)(सी) नुसार, एखाद्या प्रकरणात अनेक यंत्रणांकडे तक्रार दाखल केली गेली असल्यास लोकायुक्त कार्यालयाकडून चौकशी केली जात नाही. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात ईडीसह विविध यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, या वास्तूची मालकी सदानंद कदम यांची आहे. हे कदम सरकारी नोकर किंवा लोकसेवक नाहीत. महाराष्ट्र लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत कदम येत नाहीत. यामुळेच सोमय्या यांनी केलेली तक्रार लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे.  तक्रार फेटाळून लावल्याने अनिल परब यांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader