‘लोकप्रभा’ने ‘महोत्सवी गणेशोत्सव’ उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत यंदा रौप्य (२५ वर्षे), सुवर्ण (५० वर्षे), हीरक (६० वर्षे), अमृत (७५ वर्षे)  आणि शतकमहोत्सव (१०० वर्षे) साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी मंडळांनी गेल्या वर्षीची स्मरणिका, आर्थिक ताळेबंद आणि मंडळाच्या उपक्रमांची माहिती ‘लोकप्रभा’कडे  २०ऑगस्ट २०१४ पर्यंत पुढील पत्त्यावर किंवा मेलवर पाठवावी. या माहितीत मंडळाची स्थापना, वाटचाल, उपक्रम तसंच आत्तापर्यंतच्या वाटचालीचे चार फोटो पाठवणं अपेक्षित आहे.
पत्ता- ‘लोकप्रभा’, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१०
इमेल- response.lokprabha@expressindia.com
आणि lokprabha@expressindia.com

Story img Loader