लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (बुधवार) मुंबईत भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दादरमध्ये राज ठाकरे- अजित पवार यांचे मित्र विवेक जाधव यांच्या निवासस्थानी दुपारी चारच्या सुमारास ही भेट झाल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

दोन्ही नेत्यांकडून या बैठकीबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडीबाबत चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. तर मंगळवारी अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेविरोधात मनसेने राष्ट्रवादी आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अद्याप हाती लागलेला नाही.