वर्तमानपत्रांसाठी रोजचा दिवस लढाई असते. आज नवीन काय वाचायला मिळणार, या आशेने वाचक वर्तमानपत्र हातात घेत असतात. केवळ घोटाळे किंवा राजकीय उलथापलथ नाही तर काही मनाला स्पर्श करणा-या घटना जेव्हा एखादा पत्रकार शोधून काढतो आणि लोकांसमोर मांडतो, ते वाचून वाचकांचे डोळेही आपोआप पाणावतात. त्यामुळे वर्तमानपत्रांनाही कधी अभिनंदनाचे फोन येतात तर कधी टिकेचा सूर लावल्यावर निषेधांच्या पत्रांचा पाऊस पडतो. ‘लोकसत्ता’ने आपली ‘लोकमान्य लोकशक्ती’ ही प्रतिमा कायमच जपली आणि त्याला अनुसरूनच आपले काम सुरू ठेवले आहे. म्हणूनच सरत्या वर्षाला निरोप देताना ‘लोकसत्ता’च्या सर्वाधिक वाचल्या, चर्चिल्या गेलेल्या बातम्या पुन्हा एकदा वाचकांसाठी देत आहोत. सर्व वाचकांना नववर्षाच्या शुभेच्छा!
अग्रलेख : बळीराजाची बोगस बोंब
नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत चांगला पैसा मिळवल्याने यावेळच्या गारपिटीने ते कोलमडून पडणे शक्य नाही. व्यवसाय म्हटला की त्यात धोके आलेच. मात्र वाटेल त्या कारणासांठी मदत वा सवलती जाहीर करण्याची प्रथा कर्जबाजारी राज्यासाठी धोकादायक असल्याने सरकारने ती बंदच करावी.
पवार-मोदी गुप्त भेट!
लोकसभा निवडणुकीनंतर बदलणाऱ्या संभाव्य समीकरणांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात १७ जानेवारीला दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते.
रक्त महागले!
रक्ताची कमतरता भासू नये यासाठी राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र तरीही उपलब्ध असलेल्या रक्ताची किंमतच रुग्णांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे ‘आजार परवडला, पण उपचार आवरा’ असे म्हणायची वेळ रुग्णांवर आली आहे.
नाशिकमध्ये भुजबळांचा कोटय़वधींचा महाल
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांनी नाशिकच्या आग्रा रोडवर उभारलेली कोटय़वधी रुपयांची भव्य दिव्य हवेली पाहिल्यावर राजे-रजवाडय़ांच्या संपन्नेतचीच आठवण येते. प्राचीन आणि आधुनिक बांधकाम शैलीची ‘समता’ साधणाऱ्या या महालात अलिकडेच भुजबळ कुटुंबिय वास्तव्यास गेले आहे.
चतुरंग : झाली फुले कळ्यांची – शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा
गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आजचं आमचं हे सगळं वैभव आम्ही जोडीने मिळवलं.. अनुभवलं. अनेक भयानक अनुभव घेत आम्ही हा मार्ग चाललो आहोत ते तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे तत्त्व मनाशी बाळगत.” सांगताहेत माया जोशी आपले पती ‘जोशी वडेवाले’ शैलेश जोशी यांच्याबरोबरच्या ३० वर्षांच्या सहजीवनाविषयी..
मुंबई वृत्तान्त – प्रेयसीचा फोन टाळला, अन् घात झाला..
गणेशचे हे फोन न उचलणे त्याला काही दिवसांनी तुरुंगात टाकणार आहे, याची दोघांनाही कल्पनाच आली नाही. त्याने वैशालीची जरी समजूत काढली तरी गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो ‘समजावू’ शकला नाही. त्यातूनच उलगडा झाला डॉक्टरच्या घरातील २५ लाखांच्या दरोडय़ाचा.
महाड सत्याग्रहाची न्यायालयीन कागदपत्रे नष्ट होण्याच्या मार्गावर
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी निधी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे महत्प्रयासाने संकलित केलेली महाड सत्याग्रह व त्यासंबंधीच्या न्यायालयीन लढाईतील अत्यंत महत्त्वाची व दुर्मीळ कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बलात्काराइतकाच मुर्दाड समाजाचा डंखही विखारी
ज्याच्या खांद्यावर तिने विश्वासाने मान टाकली होती, तोही तिला सोडून आपल्या माणसांच्या कळपात निघून गेला आहे.. आता तिच्यासमोर एकच प्रश्न आहे.. जगावे की मरावे?
अंबानी रुग्णालयाला अखेर दणका!
शासकीय भूखंडावरील सर्वात महागडे रुग्णालय म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या अंधेरीतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जोरदार दणका दिला आहे.
व्हिवा : थोडक्यात पण महत्त्वाचे
स्त्रियांची अंतर्वस्त्रं हा आपल्याकडे गोपनीयतेचा विषय मानला जातो. त्याविषयी चर्चा तर सोडाच, चारचौघात ‘ब्रा’चा उच्चार करणंसुद्धा पाप असल्यासारखं वाटतं. आधुनिक कपडय़ांमध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरायचं असेल तर अंतर्वस्त्रांची निवडही अचूक असायला हवी. नेमकी याविषयीच आपल्याकडे अनास्था आहे. योग्य मापाची ब्रा वापरणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या ‘व्हिवा’मध्ये या बोलायला अवघड पण आवश्यक अशा विषयासंदर्भात चर्चा केली आहे.