देशाचा अर्थप्रपंच आणि जनसामान्यांचा संसार नेटका करू पाहणाऱ्या अर्थसंकल्पाला यंदा करोना संकटातून सावरण्याचाही पैलू आहे. अर्थसंकल्पाच्या या ‘न भूतो, न भविष्यती’ वैशिष्टय़ाचे कंगोरे आपल्यापुढे नेमके कोणत्या अर्थाने येतील, ते उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ पार पाडणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी, १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडतील आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात, करोनाकालीन स्थितीत अर्थमंत्र्यांनी साधलेल्या कसरतींचा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे वेध घेतील.

सोमवार, १ फेब्रुवारी, सायं.६वा.

वक्ते : गिरीश कुबेर

संपादक-लोकसत्ता

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. सहभागासाठी

https://tiny.cc/Ls_BudgetVishleshan_2021

येथे नोंदणी आवश्यक.

सहप्रायोजक :

* पुनित बालन ग्रुप,

* लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पॉवर्ड बाय :

* स्टोरीटेल अ‍ॅप

Story img Loader