मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्यातील तरतुदींच्या गुंतवणुकीवर होणाऱ्या परिणामांबाबत जनसामान्यांत उत्सुकता स्वाभाविकच आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पोत्तर गुंतवणुकीत आवश्यक असलेल्या बदलांची तपशीलवार माहिती देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि त्या निमित्ताने गुंतवणुकीचा जागर शनिवारी सायंकाळी दादरमध्ये होणार आहे.
गुंतवणूक साक्षरतेच्या उपक्रमांतर्गत आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड प्रस्तुत हा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ कार्यक्रम शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, कोहिनूर हॉल, दुसरा मजला, स्वामी नारायण मंदिरासमोर, दादर (पूर्व) येथे होत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. आणि जमीन प्रा. लि. हे सहप्रायोजक असलेला कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वासाठी खुला आहे. त्याचप्रमाणे उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या गुंतवणूकविषयक समस्या-शंकांबाबत तज्ज्ञांना प्रश्न विचारून उत्तरेही मिळवता येतील.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धडकी भरवणारे अनुभव सध्या येत आहेत. मात्र, देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि अर्थसंकल्पाने धोरणांना दिलेली दिशा पाहता विकासाच्या क्षेत्रातील उत्तम कंपन्यांचे समभाग निवडून दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखता येऊ शकते. अशाच अर्थसंकल्पोत्तर शेअर खरेदीबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक व स्तंभलेखक अजय वािळबे हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुचविल्याप्रमाणे नवीन प्राप्तिकर प्रणाली स्वीकारावी की पारंपरिक करबचतीसाठी गुंतवणुकीची जुनीच प्रणाली बरी (पान ११ वर) (पान १ वरून) याचे उत्तरही या निमित्ताने करसल्लागार आणि वरिष्ठ सनदी लेखापाल प्रवीण देशपांडे हे देतील. वैयक्तिक आणि कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करताना, दीर्घ मुदतीचे आर्थिक नियोजन गरजेचे आहे. या नियोजनांत बँक एफडी ते शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता अशा वेगवेगळय़ा गुंतवणुकीच्या प्रकारातील लाभ आणि जोखमीचे तिढे सोडवणेही क्रमप्राप्त ठरते. हीच गोष्ट सेबी नोंदणीकृत वित्तीय नियोजनकार तृप्ती राणे सुलभ करून सांगतील.
गुंतवणुकीचा गुणाकार :
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’
कधी : शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
वक्ते (विषय): अजय वाळिंबे (अर्थसंकल्पानंतर शेअर खरेदी)
प्रवीण देशपांडे (कर नियोजन महत्त्वाचेच)
तृप्ती राणे (गुंतवणुकीतील ‘अॅसेट अलोकेशन’)