उद्योगी राज्य म्हणून स्वतंत्र ओळख असणाऱ्या महाराष्ट्राची स्पर्धा खेटूनच असलेल्या राज्यांपासून सुरू झाली आहे. उदारीकरण पर्वाचा इतिहास होऊ लागला तसा राज्यातील उद्योगाचा आलेख अस्थिर होऊ लागला. आज केवळ विकासाच्या मुद्दय़ाभोवतीच राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण, समाजकारण फिरत असताना त्यात महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे, राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा वेग खुंटला आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज, सोमवारपासून मुंबईत सुरू होत असलेल्या ‘बदलता महाराष्ट्र : उद्योगाचे आव्हान’ या चर्चासत्रातून घेतला जाणार आहे. ‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने व ‘सारस्वत बँके’च्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्रातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबाबत विचारमंथन केले जाणार आहे.
मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये होत असलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’च्या या चौथ्या पर्वाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून ‘उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रच का?’ या विषयावरील पहिल्याच चर्चासत्रात ते भागही घेतील. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे व करतज्ज्ञ उदय पिंपरीकर हेही या वेळी आपली मते मांडतील. या सत्राखेरीज सोमवारी आणि मंगळवारी एकूण पाच चर्चासत्रे होणार आहेत.
सोमवार, दि. २३ जून
*पहिले सत्र : ‘उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रच का?’
सहभाग : उद्योगमंत्री नारायण राणे, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, करतज्ज्ञ उदय पिंपरीकर
*दुसरे सत्र : राज्यातील औद्योगिक वसाहतींचे चित्र
सहभाग : एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्सचे उदय दुधाणे, कॉटनकिंगचे अध्यक्ष प्रदीप मराठे व साण्डू फार्माचे शशांक साण्डू
*तिसरे सत्र : लघू व मध्यम उद्योगापुढील आव्हाने
सहभाग : ‘माविम’चे अध्यक्ष कमांडर दीपक नाईक, डॉ. मधुसूदन खांबेटे व आशीष शिरसाट, निर्लेप अप्लायन्सेसचे संचालक रामचंद्र भोगले.
मंगळवार, दि. २४ जून
*पहिले सत्र: ‘आम्ही उद्योजिका’
सहभाग : ‘माविम’च्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर, इंडोको रेमिडिजच्या एमडी अदिती कारे-पाणंदीकर व कमानी टय़ुब्सच्या अध्यक्षा कल्पना सरोज.
*दुसरे सत्र: ‘उद्योग आणि वित्त पुरवठा’
सहभाग : ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे पी. पी. पुणतांबेकर व एल अॅण्ड टी फायनान्सचे दीनानाथ दुभाषी.
*तिसरे सत्र: महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत का?
प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
सहभाग : कायनेटिक समुहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा शोध आणि बोध
उद्योगी राज्य म्हणून स्वतंत्र ओळख असणाऱ्या महाराष्ट्राची स्पर्धा खेटूनच असलेल्या राज्यांपासून सुरू झाली आहे. उदारीकरण पर्वाचा इतिहास होऊ लागला तसा राज्यातील उद्योगाचा आलेख अस्थिर होऊ लागला.
First published on: 23-06-2014 at 02:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra fact finding of industrial development