‘लोकसत्ता’चे वरिष्ठ आर्टिस्ट सतीश सोनावणे २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यांना संपादकीय विभागातर्फे पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
१९८७-१९८८ च्या दरम्यान ‘लोकसत्ता’मध्ये रूजू झाल्यानंतर सतीश सोनावणे यांनी ‘चतुरंग’, ‘लोकरंग’ तसेच सिनेमाविषयक ‘रंगतरंग’, ‘हास्यरंग’ इत्यादी पुरवण्यांसाठी मोठय़ा प्रमाणात काम केले. सर्व पुरवण्यांची मुखपृष्ठे आपल्या कल्पकतेने सजविण्याबरोबरच विशेष प्रसंगी काढण्यात आलेल्या पुरवण्यांची पानेही सोनावणे यांनी सजवली आहेत. ‘लोकसत्ता’च्या ५६ व्या वर्धापनदिनाची विशेष पुरवणी, माधुरी दीक्षितवर दिग्गज कवींनी लिहिलेल्या स्वहस्ताक्षरातील कवितांचे पान, ‘हास्यरंग’ पुरवण्यांची मुखपृष्ठ संकल्पना असे वैविध्यपूर्ण काम करण्याची संधी प्रदीर्घ सेवाकालात मिळाली, असे सोनावणे यांनी निरोपाच्या भाषणात सांगितले.
संपादक गिरीश कुबेर, संपादकीय विभागातील सर्व सहकारी यांनी सोनावणे यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सतीश सोनावणे सेवानिवृत्त
‘लोकसत्ता’चे वरिष्ठ आर्टिस्ट सतीश सोनावणे २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यांना संपादकीय विभागातर्फे पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
आणखी वाचा
First published on: 02-08-2013 at 03:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta designer satish sonawane retired