पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर या विभागांत घेतली जाईल.

प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या वस्तूंवर बंदी आल्याने गणेशभक्तांनी सजावट करण्याचे अनेक कल्पक मार्ग शोधून काढले आहेत. त्याला अधिक चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी ९ हजार ९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर ६ हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचबरोबर २००१ रुपयांचे विशेष पारितोषिकही दिले जाईल. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

IFA Officer Apala Mishra Success Story
UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
Ballon dOr Award Nomination List Announced sport news
मेसी, रोनाल्डो यांना वगळले! बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर
American Open Tennis Tournament rohan Bopanna Aldila Sutjiadi in semi final match sport news
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: बोपण्णा-सुतजियादी उपांत्य फेरीत; चुरशीच्या लढतीत चौथ्या मानांकित एब्डेनक्रेजिकोवा जोडीला धक्का
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
Emma Navarro defeated Coco Goff at the US Open Grand Slam tennis tournament sports news
धक्कादायक निकालांची मालिका कायम! गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ बाय ७ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या कार्यालयामध्ये ११ सप्टेंबपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावीत. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती व मखर यांची तीन वेगवेगळ्या बाजूंनी काढलेली छायाचित्रे पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी आणि मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी पाठवावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

छायाचित्रे पाठवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क

  • मुंबई : धर्मेश म्हसकर, लोकसत्ता, मफतलाल सेंटर, ७ वा मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी – ६७४४०३६९.
  • ठाणे : मिलिंद दाभोळकर, लोकसत्ता, कु सुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा, दूरध्वनी : २५३९९६०७.
  • नाशिक : प्रसाद क्षत्रिय, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी मार्ग, भ्रमणध्वनी क्रमांक – ८०८७१३४०३३.
  • पुणे : अमोल गाडगीळ, दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि., एक्स्प्रेस हाऊ स, भूखंड क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी – ०२०/६७२४१०००/ ९८८१२५६०८२.
  • औरंगाबाद : वंदन चंद्रात्रे, १०२ गोमटेश मार्के ट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद – ४३१००१, दूरध्वनी – ०२४०/२३४६३०३ / ९४२२२४५०६५.
  • अहमदनगर : संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१, भ्रमणध्वनी – ९९२२४००९८१.
  • नागपूर : गजानन बोबडे, वितरण विभाग, १९, ग्रेट नाग रोड, उंट खाना, वैद्यनाथ स्क्वेअरजवळ, नागपूर, दूरध्वनी – ०७१२ -२७०६९३२३/ ९८२२७२८६०३.

छायाचित्रे टपाल, कुरिअरने किंवा’ loksatta.ecoganesha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावीत.