करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. करोनामुळे सध्या राज्यातील मंदिरांना टाळ लागलंय. राज्यातील मंदिरं उघडण्यावरून घमासान सुरु आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा वारंवार उचलूनही धरला गेला आहे. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जातेय. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. या संदर्भातील सिद्धिविनायक मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुरावे ‘लोकसत्ता डॉटकॉम’च्या हाती लागलेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या या व्हिडीओमधून…
या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. त्यांची बाजू समजल्यावर ती देखील वाचकांना कळवण्यात येईल