करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. करोनामुळे सध्या राज्यातील मंदिरांना टाळ लागलंय. राज्यातील मंदिरं उघडण्यावरून घमासान सुरु आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा वारंवार उचलूनही धरला गेला आहे. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जातेय. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. या संदर्भातील सिद्धिविनायक मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुरावे ‘लोकसत्ता डॉटकॉम’च्या हाती लागलेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या या व्हिडीओमधून…
Exclusive: सामान्यांसाठी सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारासहित VIP व्यक्तींना मागच्या दाराने प्रवेश
सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जातंय. याचेच सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-08-2021 at 14:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta exclusive mumbai siddhivinayak temple cctv vip visitors allowed though temple is close for common public due to coronavirus scsg