‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पुण्याच्या ‘चिठ्ठी’ या लोकांकिकेने बाजी मारत महाराष्ट्राची पहिली लोकांकिका होण्याचा मान मिळविला आहे.
महाराष्ट्रातील नाटय़वेडय़ा तरुणाईला नवे अवकाश मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा नाट्यजागर शनिवारी दिवसभर प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात मोठ्या उत्साहातपार पडला.
महाअंतिम फेरी निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- चिठ्ठी (आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे )
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – कबूल है (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण)
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज, मुंबई)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे (चिठ्ठी)
सर्वोत्कृष्ट लेखक- ओंकार भोजने (कबूल है)
सर्वोत्कृष्ट अभिनय- अर्पिता घोगरदरे (चिठ्ठी)
सर्वोत्कृष्ट अभिनय- ओंकार भोजने (कबूल है)
सर्वोत्कृष्ट अभिनय- अभिजित पवार (मडवॉक)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- रेणूका जोशी (चिठ्ठी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- भरत जाधव (मसणातलं सोनं)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- नृपाल डींगणकर (चिठ्ठी)