मुंबई : जवळपास महिनाभरापासून रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आज, शनिवारी माटुंग्यातील यशवंत नाटयगृहात होणार आहे. महाअंतिम फेरीत आठ नाटयसंघांतील चुरस सकाळी ९.१५ पासून रंगणार असून, तरुणाईच्या या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते सौरभ शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी नवीन आणि उत्कृष्ट संहितेच्या तयारीपासून ते गेल्या महिन्याभरातील तालमींपर्यंत तरुण रंगकर्मीनी कौशल्य पणाला लावले आहे. आता महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी आठ नाटयसंघांच्या रंगकर्मीमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगणार आहे. 

हेही वाचा >>> म्हाडा’च्या ५६ वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ; मुंबईतील ५० हजार रहिवाशांना दिलासा

आशयघन एकांकिकांचे सादरीकरण आणि महाविद्यालयीन तरुणाईची अनोखी ऊर्जा, सभोवतालच्या घटनांवर कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची त्यांची तळमळ गेले दोन आठवडे राज्यभरातील आठ विभागांत रसिकांना अनुभवता आली. आता स्पर्धेचे प्राथमिक आणि विभागीय आव्हान यशस्वीपणे पेलून महाअंतिम फेरीत दाखल झालेले आठही नाटयसंघ सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत.

मान्यवर परीक्षक, प्रायोजक, नाटय-चित्रपट वर्तुळातील नामवंतांच्या मांदियाळीत हा महाअंतिम सोहळा रंगणार असून, ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान कोण पटकावणार, याबाबत उत्सुकता आहे.

आठ नाटयसंघ

० ‘चला निघायची वेळ झाली’- भारतीय महाविद्यालय, नागपूर</p>

० ‘एकूण पट १’- व्ही. जी. वझे महाविद्यालय, मुंबई,

० ‘सिनेमा’- वाणिज्य महाविद्यालय (एमएमसीसी) – पुणे,

० ‘पार करो मोरी नैया’- विवेकानंद महाविद्यालय-कोल्हापूर

० ‘उणिवांची गोष्ट’- ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे</p>

० ‘कोंडी’- गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

० ‘लाल डबा’- के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक

० ‘नूर-ए-अखलाख’- सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

मकरंद देशपांडे यांच्या नाटकाची झलक

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या ‘मनुष्य’ या नव्या  नाटकातील नाटयप्रवेश हेही या सोहळय़ाचे खास आकर्षण आहे. मकरंद देशपांडे लिखित ‘मनुष्य’ या नाटकाचे तीन नाटयप्रवेश आकांक्षा गाडे, आशिष गाडे, इशा डे, हिमांगी शुक्ला आणि सुशील आदी कलाकार ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळय़ाच्या मंचावर सादर करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika mega final today in presence of actor saurabh shukla zws
Show comments