मुंबई : महाराष्ट्रातील तमाम युवावर्गाला जोडणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे पुनश्च पडघम वाजले आहेत. दिवाळीची धामधूम संपून आता स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांचे वेध तरुण रंगकर्मीना लागले आहेत. स्पर्धेचा उत्साहही आहे, विषयांचे वैविध्यही आहे आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’चा मंचही सज्ज आहे. मग वाट कसली पाहताय? तुमच्या महाविद्यालयाची उपस्थिती या मंचावर नोंदवण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या सातव्या पर्वाला लवकरच सुरुवात होत आहे. दिवाळी आणि क्रिकेटच्या विश्वचषक सामन्यांची मजा लुटल्यानंतर आता उत्कंठा आहे ती २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या तरुणाईचा सृजनाविष्कार सोहळा अनुभवण्याची संधी देणाऱ्या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची.. या स्पर्धेसाठी राज्यातील आठही केंद्रांवर महाविद्यालयांचे प्रवेश अर्ज येऊ लागले आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत संपण्याआधी तुमचे प्रवेश अर्ज पोहोचू द्या. पुणे आणि कोल्हापूर विभागासाठी २० नोव्हेंबर ही प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या विभागांसाठी २५ नोव्हेंबर ही प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.
हेही वाचा >>>मुंबई-गोवा विशेष रेल्वेगाड्या धावणार, मुंबईकरांना गोव्यातील नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होता येणार
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील युवकांनाही आपले नाटय़गुण सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रसिक आणि नाटय़क्षेत्रातील जाणकारांकडून होणाऱ्या कौतुकाबरोबरच करिअरची लाखमोलाची संधी देणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयीन रंगकर्मी मोठय़ा तयारीनिशी उतरतात. ही सुवर्णसंधी हातून निसटण्याआधी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी विहित मुदतीत आपले प्रवेश अर्ज दाखल करा. एकूण आठ विभागांत होणाऱ्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांचे आव्हान पूर्ण करत निवडून येणाऱ्या प्रत्येकी पाच एकांकिकांची त्या त्या केंद्रांवर अंतिम फेरी पार पडेल आणि त्यात पहिल्या आलेल्या आठ विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत १६ डिसेंबर रोजी होणार आहे.
स्पर्धकांसाठी विभागवार संपर्क क्रमांक
मुंबई : मकरंद पाटील – ९८९२५४७२७५
पुणे : राम शेंडे – ९८३३२१४४६०, ९८३३२१४४६०
कोल्हापूर : संदीप गिरीगोसावी – ९६५७२५५२७७
ठाणे : कमलेश पाटकर (ठाणे) – ९८२०६६४६७९ / समीर म्हात्रे (नवी मुंबई) – ९६१९६३०५६९
औरंगाबाद : वंदन चंद्रात्रे – ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३ सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६
रत्नागिरी : राजू चव्हाण – ९४२३३२२११६
नाशिक : प्रसाद क्षत्रिय – ८०८७१३४०३३
नागपूर : गजानन बोबडे – ९८२२७२८६०३
मुख्य प्रायोजक
’सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक
’भारती विद्यापीठ, पुणे
’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट
पॉवर्ड बाय ’केसरी टूर्स
’शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर ’श्री नेमिनाथ ज्वेलर्स
साहाय्य ’अस्तित्व
टॅलेंट पार्टनर
’आयरिस प्रॉडक्शन