१४ जानेवारी १९४८ या दिवशी ‘लोकसत्ता’चा पहिला अंक प्रकाशित झाला त्यात महात्मा गांधी यांची ‘करेंगे या मरेंगे’ची हाक हा मुख्य मथळा होता. देशात धार्मिक, जातीय ऐक्य टिकावे यासाठी ती हाक देण्याची गरज गांधी यांस वाटली. ‘लोकसत्ता’ आज ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना त्या हाकेमागील वास्तव किती बदलले आणि किती नाही, हे सुज्ञांस सांगण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बदललेली नाही ती ‘लोकसत्ता’ची कर्तव्य जाणीव ! राजकीय विचारधारानिरपेक्ष पत्रकारिता हे ‘एक्स्प्रेस’ समूहाचे अत्यंत महत्त्वाचे गुणवैशिष्टय़. राजकीय पक्षांचा जय-पराजय होत असतो. पण हार-जितीच्या हिशेबी समीकरणांवर दशांगुळे ठाम उभी राहण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त याच पत्रकारितेत असते.

राज्यघटनेने हमी दिलेले माध्यमांचे स्वातंत्र्य ते हेच. त्याचे रक्षण हेच ‘लोकसत्ता’चे पहिल्या अंकापासूनचे ब्रीद. यापुढेही ते तसेच राहील, हा अमृतमहोत्सवाचा निर्धार. देश ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करत असताना ‘अमृतमहोत्सवी आजादी’चे महत्व आणि महात्म्य आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ या ! – संपादक