दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटांची माहिती व्हावी आणि या माहितीच्या मदतीने त्यांना अभ्यासक्रमाची निवड करणे सुकर व्हावे, याकरता आजपासून ‘लोकसत्ता’च्या मुख्य अंकात ‘मार्ग यशाचा’ हे सदर सुरू करत आहोत.
हे दैनंदिन सदर ५५ दिवस सुरू राहील. यामध्ये दहावी-बारावीनंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या विविध पर्यायांची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर ‘मार्ग यशाचा’ या सदरात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विविध पर्याय, एकात्मिक अभ्यासक्रम, दर्जेदार शिक्षणसंस्थांची माहिती व प्रवेशप्रक्रिया, महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षा, विविध करिअर संधी असा भरगच्च मजकूर असेल. अभ्यासक्रमांची अथवा शिक्षणसंस्थांची निवड करताना कुठली काळजी घ्यावी, प्रवेशाच्या वेळेस आवश्यक ठरणारी प्रमाणपत्रे, कल चाचणीचे महत्त्व, विविध विद्याशाखांतील मुलखावेगळे पर्याय अशा करिअरला पूरक ठरणाऱ्या महत्त्वाच्या विषयांबाबतही या सदरात मार्गदर्शन केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha start from today